MPSC विद्यार्थ्यांचे तारणहार मा. आमदार श्री अभिमन्यू पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाकडून विविध संवर्गातील जागावाढ बद्दल मा. मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना विनंती केली होती.
विद्यार्थ्यांच्या विनंतीस मान देऊन लोकप्रिय मुख्यमंत्री देवाभाऊंनी आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांना महसूलचा कणा असलेली तलाठी पदभरती व विविध संवर्गातील पदभरती MPSC गट क 2026 च्या जाहिरातीत जागावाढ करून आनंदाची बातमी दिली..
अजूनही विविध विभागातील रिक्त जागा MPSC कडे पाठवून जास्तीत जास्त मोठी पद भरती करण्याचे आश्वासन मा. आमदार अभिमन्यू पवार साहेब यांनी केले.
विद्यार्थ्यांनी निश्चिंत राहून अभ्यासावर लक्षकेंद्रीत करावे, सरकार विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठाम उभे आहे, अशी ग्वाही विद्यार्थ्यांना दिली.
आ. अभिमन्यू पवार साहेब, आमचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे.
आपण स्वतः तर अशा गैरप्रकारांना थारा देणार नाहीतच पण याबाबत सखोल चौकशी करून कार्यवाही करायला लावाल असाही आम्हाला विश्वास आहे.🙏🙏🙏
https://x.com/i/status/2082116403432476797
स्पष्टीकरण व निवेदन
नमस्कार,
माझा MPSC औषध निरीक्षक (Drug Inspector) गट ब परीक्षेच्या २२ जुलै रोजी जाहीर झालेल्या गुणवत्ता यादीत 31 क्रमांक आला आहे .माझ्या निवडीसंदर्भात सोशल मीडियावर काही व्यक्तींनी माझ्याविषयी चुकीची, दिशाभूल करणारी आणि बिनबुडाची माहिती प्रसारित केली आहे. त्यामुळे या निवेदनाद्वारे मी वस्तुस्थिती पुराव्यांसह स्पष्ट करत आहे.
एखाद्या महिलेचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करून तिच्याविषयी कोणतीही माहिती सत्यता पडताळून न पाहता प्रसारित करणे अत्यंत गैरजबाबदारपणाचे आहे. संबंधितांनी कोणत्याही व्यक्तीची बदनामी होईल, अशा प्रकारे वर्तन करू नये. प्रत्येकाने सोशल मीडियावर व्यक्त होताना जबाबदारीचे भान ठेवणे आवश्यक आहे.
मी आधी Pharmacy diploma आणि त्यानंतर Pharmacy मध्ये पदवी पूर्ण केली असून व सोबतच ३ वर्ष तांत्रिक पदावर कंपनी मध्ये जॉब देखील केलेला आहे.
माझी निवड माझ्या पात्रतेच्या, गुणवत्तेच्या आणि मेहनतीच्या बळावर झाली आहे.
ज्या फोटोचा आधार घेऊन माझ्याबाबत चुकीचा प्रचार करण्यात येत आहे, त्या फोटोबाबत वस्तुस्थिती अशी आहे की, मुख्यमंत्री महोदयांनी इतर संवर्ग MPSC कक्षेत समावेश करून ऑगस्ट 2027 पर्यंत ऑफलाइन परीक्षेचा निर्णय घेतल्याबद्दल आमचे शिष्टमंडळ त्यांना भेटले होते. त्या वेळी मुख्यमंत्री महोदयांना पुष्पगुच्छ देताना तो फोटो काढण्यात आला होता. आम्ही कोणत्याही वैयक्तिक किंवा राजकीय कारणासाठी नव्हे, तर एक सामान्य विद्यार्थी म्हणून ती भेट घेतली होती. मात्र, त्याच फोटोचा विपर्यास करून माझी बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
माझ्याविषयी FDA Chemical Analyst परीक्षेबाबतचे रँक आणि मार्क्स बाबत करण्यात आलेले सर्व आरोप पूर्णपणे निराधार, असत्य आणि दिशाभूल करणारे आहेत. या निवेदनासोबत संबंधित सर्व पुरावे जोडत आहे, जे सत्य परिस्थिती स्पष्ट करतात.
माझी सर्वांना नम्र विनंती आहे की, सोशल मीडियावर कोणत्याही व्यक्तीविषयी माहिती प्रसारित करण्यापूर्वी तिची सत्यता पडताळावी आणि जबाबदारीने वागावे.
माझी प्रतिमा मलिन करण्याच्या उद्देशाने खोटी व दिशाभूल करणारी माहिती प्रसारित करणाऱ्या संबंधित व्यक्तींविरुद्ध मी कायदेशीर कारवाई करणार असून, त्याबाबतची प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येईल.
तसेच, या संपूर्ण प्रकरणाची सखोल, निष्पक्ष व पारदर्शक चौकशी करण्यात यावी, अशी माझी संबंधित प्र
♦️मा. मुख्यमंत्री यांनी सदर प्रकरण अत्यंत गांभीर्याने घेतले असून सखोल चौकशी करुन जबाबदार असणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे : आ. अभिमन्यू पवार साहेब..
https://x.com/AbhiPawarBJP/status/2092509049426481343
सोशल मिडिया वर सुनिल गाढवे यांच्या अटकेबद्दल चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. अशी कोणतीही अटक किंवा काही झालेली नाही. सदर प्रकरणात सुरवातीपासून राजकीय द्वेषापोटी ह्यांच नाव घेत आहेत आणि आजदेखील मुद्दाम खोडसाळपणा केला आहे.तरी कोणीही अफवांवर विश्वास ठेऊ नये.
मंत्रालयात महत्त्वाच्या मागण्यांवर चर्चा: MPSC परीक्षांतील optional गुणांमधील तफावत आणि पेपर री-चेकिंगसाठी आमदार अभिमन्यू पवार यांना विनंती केली ; या विषयाबाबत लवकरच मुख्यमंत्र्यांना पत्र देणार
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे (MPSC) घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा मुख्य 2025 परीक्षा मध्ये उमेदवारांवर होणाऱ्या अन्यायाबाबत आज, २ सप्टेंबर २०२६ रोजी मंत्रालय, मुंबई येथे मा. आमदार अभिमन्यू पवार यांच्यासोबत विविध महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर दीर्घ आणि सखोल चर्चा पार पडली. या बैठकीदरम्यान परीक्षार्थी उमेदवारांच्या विविध समस्या मांडण्यात आल्या.
या बैठकीत प्रामुख्याने खालील तीन मुख्य मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली:
1. वैकल्पिक (Optional) विषयांच्या गुणांमधील तफावत: वेगवेगळ्या वैकल्पिक विषयात मिळणाऱ्या गुणांमध्ये मोठ्या प्रमाणावर विषमता दिसून येत असून, काही विशिष्ट विषयांत अवाजवी गुण तर काही विषयांत अत्यंत कमी गुण दिले जात असल्याचा मुद्दा समोर आला.
2. गुणपत्रकांमधील (Mark sheets) विसंगती: सादर करण्यात आलेल्या अनेक निवेदनांमधील गुणपत्रकांचे विश्लेषण केले असता, 'निबंध' आणि 'वैकल्पिक विषय' (Optional Subject) या दोन्ही विभागांतील गुणांमध्ये मोठ्या प्रमाणावर फरक असल्याचे स्पष्ट झाले.
3. पेपर री-चेकिंगची मागणी: ज्या उमेदवारांनी आपल्या गुणांवर आणि उत्तरपत्रिकांवर आक्षेप नोंदवले आहेत, त्या सर्व उमेदवारांच्या उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन (Re-checking) करण्यात यावे.
आमदार अभिमन्यू पवार यांनी या सर्व मागण्या गांभीर्याने ऐकून घेतल्या. कोणत्याही उमेदवारांवर अन्याय होणार नाही, असा विश्वास देत त्यांनी मा. मुख्यमंत्री आणि मा. सचिव यांना या संदर्भात तातडीने अधिकृत विनंती पत्र पाठवून योग्य ती सकारात्मक कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
👍👍👍
गट-क साठी सध्या रिक्त असलेली तसेच आगामी काळात रिक्त होणारी पदे विचारात घेऊन अतिरिक्त मागणीपत्रे लोकसेवा आयोगास पाठवावी : आ. अभिमन्यू पवार
मागणीप्रमाणे कार्यवाही करण्याचे मा. मुख्यमंत्री यांचे GAD ला निर्देश 🔥