🔥आता कुठे ........🔥
आंदोलन खूप उत्तम सुरू आहे, तिथे बसून भाषणे ऐकताना पण मनाला मस्त वाटते, त्याच भाषणातून कुणाला भविष्यातील पक्ष प्रवक्ता म्हणून संधी उपलब्ध होत आहे, कुणाला स्वतःची कला सादर करण्याची संधी मिळत आहे, आज अनेक नेत्यांनी भेट देखील दिल्या, 👉तिथून उठून आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी आलो आणि मस्त झोपलो, त्यात एक चांगले स्वप्न पडले. 👉 अध्यक्षांनी राजीनामा दिला आणि आयोग नीट (NEET) झाला🔥
आंदोलनात सर्वत्र आनंदी आनंद, आणि अखेर आंदोलन यशस्वी झाले....!!!
अध्यक्ष गेले....,सचिव गेले...
मुले अभ्यासिकेत....
आमच्यासारखी लेखक पुस्तक लिहिण्यात आणि Lecture घेण्यात व्यस्त....
लायब्ररी सुरू.. .mess सुरू...
पदवीधर निवडणुका सुरू...
प्रचार सुरू.. दुष्काळ दौरे सुरू...
आता स्वप्नात गेली 6 (सहा) महिने सगळ चांगलं सुरू असताना.
👉माझ्या Forest बॅच च्या पोराला फोन करून काय गरज होती विचारायची की वनसेवा मुख्य चा निकाल कधी लागेल म्हणून 😡😡
त्याला इतके समजू नये की पेपर चेकिंग (रिचेकिंग) सुरू आहे,कारण आता कुठे 👉6 महिने झाले नवीन अध्यक्ष आणि सचिव आले आहेत... वाट बघावी जरा..
आता combine मुख्य PYQ मंथन पुस्तकासोबत त्याची batch पण उत्तम सुरू आहे, मग त्यातल्या एका बाब्याला काय गरज होती विचारायची मुख्य परीक्षा कधी आहे म्हणून...कारण आता कुठे....
आता एका अंध अपंग आणि खेळाडू विद्यार्थ्यांने मला विचारले सर ते आमच्या आरक्षणात घोटाळेखोर येतात त्याच काय झाले, आता त्या अपंग च ठीक आहे त्याला नसेल माहित, आता कुठे..
पण खेळाडूने असले काय विचारायची गरज आहे का.. कारण आता कुठे...
सगळ्या गोष्टींना वैतागून (स्वप्नातच आहे) चहा प्यायला गेलो तिथे भेटला एक Objective वाला, ते विचारतय कधी 2027 की 2028 आता त्याला तर ॲनालिसिस करताच येत नाही, कारण आता कुठे...
त्यात एक अजून कमवा शिका वाला भेटला आणि म्हणाला 70k आहे ना नक्की, आणि वेळापत्रक कधी येणार म्हणजे त्यानुसार कामावर सुट्टी टाकता येईल. आता या अतिकामाच्याला कोण सांगणार आता कुठे....
शेवटी वैतागून हेच सांगेन Opting out, waiting list, Preference, निष्पक्ष चौकशी, काहीच कुणाला विचारू नका, कारण आता कुठे...
👉मला आता झोपू द्या, तुम्ही पण झोपा मस्त...... कारण आता कुठे...
🖋️ मघा
@Rukminiacademy