Swami
ज्याप्रमाणे बहुमत चाचणी साठी न्यायालय आदेश देतं की २४ तासांत किंवा ४८ तासांत बहुमत चाचणी घ्या कारण आमदार खासदार यांचा घोडेबाजार होऊ नये म्हणून...
उदा. अनिलकुमार झा खटला २००५, चंद्रकांत कावळेकर खटला २०१७, जी परमेश्वर खटला २०१८ यात न्यायालयाने राज्यपालांना
२४ ते ४८ तासांत बहुमत चाचणी घेण्यासाठी सांगितलं.
त्याचप्रमाणे MJP सारख्या परीक्षेत सुध्दा निकाल जाहीर करण्यासाठी काही कालमर्यादा असायला हवी की नको?
जर कालमर्यादा नसेल तर I love pdf किंवा excel वापरून जे निकाल तयार केले जातात ते त्यात वेळ का घेतला जातो?
घोडेबाजार जोपर्यंत मनाप्रमाणे होत नाही तोपर्यंत निकाल जाहीर करण्यासाठी वेळ घेतात का? अशी शंका कुणी उपस्थित केली तर त्यावर काय बोलणार?
जरी लागला निकाल वर्षाने तर तो पारदर्शक आहे हे कसं समजायचं?
जर महिन्यात पुन्हा परीक्षा घेऊन त्यापुढिल ०७ दिवसांत निकाल लावायला काय हरकत आहे?
विश्वगुरूंच्या विकसित भारतात, डिजिटल इंडियाच्या क्रांतीत परीक्षाचे निकाल लागत नाहीत इतका विकास बघून अश्रू अनावर होताय...
@BloggerSwami
2 · 1.3K ·