Русский
Открыть в Telegram
BBlogger Swami

Blogger Swami

@BloggerSwami · канал · Образование · в индексе с 04.10.2026
284подписчиков
737средний охват поста
26%ER — охват к подписчикам
31постов за 30 дней
S
Видео
29.8 МБ
🛑PMC JE आणि MMRDA JE मुद्दा = आम्हाला पण हेच वाटतेय या दोन्ही EXAM तात्काळ रद्द करून फेरपरीक्षा घेणे संयुक्तिक राहील =PMC च्या अधिकारी लोकांनी भरतीत घोटाळा करून रेटून नेलीय ☑️☑️ 🙏PMC पुढे पुन्हा आंदोलन केल्यास आमचा पूर्ण पाठिंबा राहील 🔥🔥 जॉईन 👉@officersfactory2026
2 · 264 ·
S
समिती स्थापन करण्याची शिफारस करण्यासाठी ३ महिने... त्यानंतर समिती स्थापन करण्यासाठी ३ महिने... समितीला लोकांच्या शंका, सल्ले किंवा इतर काही प्रश्न पाठवण्यासाठी ३ महिने... समितीला त्यावर अभ्यास करण्यासाठी अजून ३ महिने.... अभ्यास सुरू आहे म्हणत अजून मुदतवाढ म्हणून पुन्हा ३ महिने... मध्येच निधी संपला म्हणून पुन्हा ३ महिने... पुन्हा आचारसंहिता लागली म्हणून ३ महिने... सदस्य, अध्यक्ष महोदय आजारी पडले म्हणून पुन्हा ३ महिने... परदेश किंवा परराज्यातील दौऱ्यासाठी पुन्हा ३ महिने... इतकी मुदतवाढ देऊन देऊन अहवाल कालबाह्य होऊन जातो... मग काय पुन्हा उपसमिती... म्हणूनच की काय, साहेब नेहमीच म्हणतात अभ्यास सुरू आहे. @BloggerSwami
376 ·
Swami
Фотография
काल कामगार विभागाचा निकाल लागला सहज निकालाची pdf चेक केली तर निकाल एक्सल मध्ये निधी नावाच्या कुणीतरी बनवला आहे असं दिसतंय. जर tcs निकाल एक्सल मध्ये बनवायला लागलं तर सॉफ्टवेअर काय हळद कुंकू लावायला ठेवलेत का असा प्रश्न पडतो एक्सल मध्ये निकाल बनवला तर त्या निकालावर किती विश्वास ठेवणार? @BloggerSwami
39 · 5.5K ·
एक लक्षात घ्या की descriptive आणि objective ह्या परीक्षा पध्दती आहेत आणि दोन्ही मध्ये चांगल्या प्रकारे परीक्षा घेण्यासाठी पात्रता आहे. पण MPSC ने घेतलेल्या Descriptive ची हालत बघून MPSC ने Objectiveच घ्यावी ह्या मताचा मी तरी आहे. मुख्य मुद्दा descriptive objective चा नसून MPSC च्या शुद्धीकरणचा आहे, शुद्धीकरण म्हणजे कथित घोटाळे झाले त्या काळात असलेल्या सगळ्या कर्मचारी अध्यक्ष अधिकारी अशा सर्वांनी राजीनामा दिला पाहिजे नाहीतर descriptive घ्या की objective वाटोळं आपलंच होणार... टीप : मी descriptive चांगल्या प्रकारे लिहू शकतो तरीही objective ला साथ देतोय त्याच कारण म्हणजे MPSC कशा प्रकारे descriptive पेपर चेक करते त्याचा फटका मला सुद्धा बसला आहे, मेन्स दिलेल्या प्रत्येकाला बसलाय @BloggerSwami
1 · 1K ·
S
ज्याप्रमाणे बहुमत चाचणी साठी न्यायालय आदेश देतं की २४ तासांत किंवा ४८ तासांत बहुमत चाचणी घ्या कारण आमदार खासदार यांचा घोडेबाजार होऊ नये म्हणून... उदा. अनिलकुमार झा खटला २००५, चंद्रकांत कावळेकर खटला २०१७, जी परमेश्वर खटला २०१८ यात न्यायालयाने राज्यपालांना २४ ते ४८ तासांत बहुमत चाचणी घेण्यासाठी सांगितलं. त्याचप्रमाणे MJP सारख्या परीक्षेत सुध्दा निकाल जाहीर करण्यासाठी काही कालमर्यादा असायला हवी की नको? जर कालमर्यादा नसेल तर I love pdf किंवा excel वापरून जे निकाल तयार केले जातात ते त्यात वेळ का घेतला जातो? घोडेबाजार जोपर्यंत मनाप्रमाणे होत नाही तोपर्यंत निकाल जाहीर करण्यासाठी वेळ घेतात का? अशी शंका कुणी उपस्थित केली तर त्यावर काय बोलणार? जरी लागला निकाल वर्षाने तर तो पारदर्शक आहे हे कसं समजायचं? जर महिन्यात पुन्हा परीक्षा घेऊन त्यापुढिल ०७ दिवसांत निकाल लावायला काय हरकत आहे? विश्वगुरूंच्या विकसित भारतात, डिजिटल इंडियाच्या क्रांतीत परीक्षाचे निकाल लागत नाहीत इतका विकास बघून अश्रू अनावर होताय... @BloggerSwami
2 · 1.3K ·
Swami
जर एखाद्या परीक्षेत पेपर फुटला, किंवा कोणत्या का मार्गाने पेपर बाहेर गेला तर त्या पेपरमध्ये खऱ्या अभ्यास करणाऱ्या उमेदवारांना आणि घोटलेबाज लोकांना वेगळं करणं निव्वळ अशक्य असतं. सगळेच म्हणतात मी प्रामाणिक आहे. कुणाकुणावर विश्वास ठेवणार? त्यापेक्षा पुन्हा परीक्षा घेऊन त्या परीक्षेत प्रत्येक परीक्षा केंद्राचे आतले आणि बाहेरचे CCTV फुटेज आवाजसह वेबसाईटवर टाकायचे. स्क्रीन मिरर आणि इतर टेक्निकल रिपोर्ट लगेच पेपरच्या 24 तासांच्या आत वेबसाईटवर टाकायचा... तुम्ही पारदर्शक आहात हे नुसतं निवडणुकीच्या आश्वसनांसारखं सांगू नका... प्रत्यक्षात दाखवा आणि नेत्याला बापापेक्षा मोठं मानणाऱ्यानी तुमच्या दत्तक बापाला सुद्धा सांगा हे करायला... तेवढंच तुमचा बाप जो तुम्हाला अधिकारी बघण्यासाठी वाट बघतोय त्याला हायसं वाटेल... @BloggerSwami
237 ·
S
पैसे भरून लागलेली आणि लागू इच्छित असणारी जनता... नक्की लक्षात ठेवा... तुमचे कर्म फिरून तुमच्याच गाडीत 🚗 घुसणार आहेत... दिवस पालटतात, ज्यांना तुम्ही पैसे दिलेत ते तुम्हाला आयुष्यभर सह्या मारायला लावतील... ते म्हटले उठ तर तुम्हाला उठावं लागेल, बस म्हटले तर बसावं लागेल... काढू का प्रकरण बाहेर म्हटलं की लोकांकडून खाऊन त्यांना नेऊन द्यावं लागणार😁 BP, शुगर, हार्ट सगळं भेट घेण्यासाठी येईल... आधी बकरा मोठा करतील... मग कापतील... टीप: माझ्या जीभेवर तीळ आहे😜 @BloggerSwami
242 ·
Swami
मित्र वनव्या मध्ये गारव्या सारखा..😂 पेपर कधी फुटला हे जरी एकवेळ मान्य केलं तरीही कार्यकाळ सुरू झाल्यानंतर 1 महिन्यांपेक्षा जास्त काळ लोटला तरीही पेपर फुटला हे समजत नसेल तर काय करणार? नैतिकतेच्या आधारे राजीनामा द्यायला नैतिक मूल्य नुसते रट्टा मारून उपयोग आहे की अंगीकृत केल्याचा उपयोग आहे? समितीचे काय घेऊन बसलात? कित्येक समित्या स्थापन झाल्यात... त्याचं पुढे काय झालं? तुम्ही राजीनामा घेऊ शकत नसाल तरीही राष्ट्रपतीना तशी विनंती तर करू शकता ना? जर समितीची चौकशी सुरू असताना पदावर असतील तर समिती पारदर्शकपणे चौकशी करू शकते का? @BloggerSwami
234 ·
बरं ते MMRDA AE/JE पेपरच्या कथित घोटाळ्याप्रकरणी 19 ऑगस्ट रोजी समिती स्थापन करण्यात आली होती, त्याच पुढं काय झालं कुणाला कळलंय का?🤔 @BloggerSwami
2 · 1.9K ·
Фотография
NMMC JE mechanical engineering चा निकाल कुणी तयार केला, कसा तयार केला ते तुम्हीच बघून घ्या... जर excel वर निकाल बनवायचा असले तर सॉफ्टवेअर कशाला आहेत? 900-1000 रुपये घेतले थोडंस तर सिरीयस व्हा येऊ द्या की डायरेक्ट सॉफ्टवेअर मधून निकाल @BloggerSwami
3 · 1.2K ·
Фотография
डिग्री - डिप्लोमा चे डायलॉग Elon आप्पा पर्यंत पोहचले वाटतं ह्या ट्विट मध्ये तो directly/ indirectly म्हणतोय कोंपिटीशन ला घाबरला का 😂😂😂 @BloggerSwami
176 ·
S
Видео
IMG_2038.MP4 · 22.6 МБ
I’ve been fighting Narendra Modi and the RSS for over a decade now. I understand them like you would understand your opponent - inside out, like the back of my hand. The core characteristic of these people is cowardice. Narendra Modi, Amit Shah, Mohan Bhagwat, Gyanesh Kumar and Ajit Doval, the villains of this story, are slowly finding the space closing around them. We are closing that space. Mr. Modi, do whatever you want. Call out all the police: 10,000, 20,000, 50,000, whatever you want. Arrest all the leaders. Arrest all the young people. Arrest us all. We are surrounding you, and we are not going to back down. Mark my words: we already have the information we need. We are going to defend our Constitution. We are going to protect the voice of the Indian people. And we are going to ensure that what was done to India over the last 10-15 years will never, ever be… X: https://x.com/rahulgandhi/status/2108879919535341863 FB: https://www.facebook.com/share/v/19tAHqpYw5/?mibextid=wwXIfr
171 ·
Swami
Фотография
आई तुझ्याकडून काय मागू? तुला तर सर्वच माहिती आहे... अध्यक्षाला राजीनामा देण्याची बुद्धी दे संपूर्ण MPSC चं शुद्धीकरण कर, आताचा एकही ठेवू नको, सगळ्यांचे राजीनामे घे... नवीन अधिकारी, कर्मचारी, अध्यक्ष येताना तुकारामासारखे येऊ दे सर्वजण... सरळसेवा ला लागलेलं पेपरफुटी, सेंटर्स मॅनेज, I love pdf, excel चं ग्रहण सोडव... पारदर्शक परीक्षा होऊ दे... तिकडे तो ग्यानू आणि त्याच्या आंगठाछाप आकांच्या तावडीतून माझ्या देशाला सोडव... घटस्थापनेच्या, नवरात्र उत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा🙏😊 @BloggerSwami
1 · 157 ·
इतका असंवेदनशीलपणा येतो तरी कुठून? अरे तुम्ही जी पुस्तकं वाचून खुर्चीवर बसलात ती पुस्तकं तुम्हाला कळली असती तर असं बोलणं तर लांबच राहिलं, असा विचार सुध्दा मनात आला नसता... पुरावे गोळा करायचं काम विद्यार्थ्यांचं आहे का? पण नाईलाजाने त्यात उतरावं लागतंय पोरांना... ज्याचं काम आहे त्याने ते नीट केलं असतं... (नीट चं नाव पण खराब आहे) तर ही वेळ आली नसती पोरांवर... तुम्ही खुर्च्या खाली करा... हजारो लाखो पोरं जे खरंच लायक आहे खुर्च्यांचे ते अभ्यास करत आहेत आणि ज्यांच्या बापाकडे हरामाचा पैसा पडलाय ते फोडलेल्या पेपर मधून, तुमच्या excel , I love pdf द्वारे खुर्च्या उबवत बसलेत... गरुड पुराणातील शिक्षा कमी पडतील असंवेदनशील, पेपरफोड्या आणि ते पेपर देऊन किंवा विविध प्रकारचे घोटाळे करून खुर्च्यांचे मालक बनलेल्या हरामखोरांना... राहिला प्रश्न आश्वसनाचा तर आश्वसनं देणार्याने आजपर्यंत किती आश्वासन पूर्ण केलीत आणि किती फेकूपणा केला यावरून पब्लिक सब जाणती है @BloggerSwami
2 · 151 ·
लय समित्या झाल्यात राव पुन्हा समिती नको🙏 एकतर समिती जितका वेळ घेते त्याबद्दल बोलावं तितकं कमी आहे... त्या समितीचा अहवाल स्वीकारणार की नाही हा पण मोठा प्रश्न असतो पुन्हा पेपरच्या वेळी चालू घडामोडी मध्ये आधीच चिक्कार समित्या अभ्यासाव्या लागतात त्यात अजून भर पडते बाकी काही होत नाही. जावा अध्यक्ष साहेब सगळे कर्मचारी अधिकारी घेऊन मग बसा निवांत समिती समिती खेळत 🙏🙏🙏🙏
1 · 132 ·
S
Фотография
😊काकांनी राजीनामा दिला नसला तरीही चौकशी पूर्ण होईपर्यंत रजेवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. (काकांना सक्तीच्या रजेवर पाठवलं नाही तर काकांनी रजा घेतली. यातला फरक सकाळी सांगतो पण एक नक्की की काका चौकशी होईपर्यंत आयोगात येणार नाहीत, अध्यक्षांनी ट्विटरवर रजा घेण्याचे जाहीर केले असले तरी, ती प्रशासकीय फाईलद्वारे राज्यपालांकडून मंजूर होणे बंधनकारक आहे. ते होईलच असं मानुया. ☺️ 60 दिवसांत चौकशी करण्यासाठी न्यायिक आयोग नेमलेला आहे त्यात तुकाराम मुंढे साहेब आहेत. 🏆 या सर्व लढ्यात विद्यार्थी एकजुटीने करून दाखवलं त्यात प्रामुख्याने ऋषीभाऊ गांगर्डे, माननीय आमदार रोहित दादा पवार साहेब, आणि इतर सर्व आंदोलनकर्ते परीक्षार्थी, आणि आंदोलनात भेट देऊन पाठिंबा दिलेले सर्व राजकीय, सामाजिक सन्माननीय व्यक्ती यांचे खूप खूप आभार🙏🙏🙏 बाकी सकाळी बोलू निघतो घरी आता😊 @BloggerSwami
1 · 90 ·

Открытая публичная лента из поискового индекса ChatCrawler — «Google по публичному Telegram»; обновляется по мере обхода площадки. Время — UTC.

Только публичный контент, официальный API Telegram. О проекте · Вопросы · Границы индекса · Убрать страницу из выдачи · Каталог · Поиск · Как мы считаем