🙏🌺 हे जगदंबा भवानी माता, तुझ्याकडून आणखी काय मागू?
तुला तर सर्व काही माहीत आहे… 🙏🚩
फक्त एवढंच मागणं आहे—
⚖️ MPSC च्या अध्यक्षांना सद्बुद्धी दे. सत्य स्वीकारून योग्य निर्णय घेण्याची आणि नैतिक जबाबदारी पार पाडण्याची ताकद दे.
🏛️ संपूर्ण MPSC व्यवस्थेचं शुद्धीकरण होऊ दे. जिथे जिथे गैरप्रकार झाले असतील, तिथे निष्पक्ष चौकशी होऊ दे. दोषींवर कठोर कारवाई होऊ दे आणि जबाबदार पदाधिकाऱ्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव होऊ दे.
नवीन अधिकारी, कर्मचारी आणि अध्यक्ष येताना तुकारामजी मुंढे साहेबांचा विचारांप्रमाणे प्रामाणिक, निःस्वार्थी आणि जनतेप्रति उत्तरदायी होऊ दे! 🙏
📚 सरळसेवा परीक्षांना लागलेलं पेपरफुटी, परीक्षा केंद्रांतील कथित गैरप्रकार, सेंटर मॅनेजिंग आणि PDF-Excel च्या माध्यमातून होणाऱ्या अनियमिततांचं ग्रहण कायमचं सुटू दे!
विद्यार्थ्यांच्या मेहनतीला न्याय मिळू दे. परीक्षा पारदर्शक होऊ देत. गुणवत्तेला महत्त्व मिळू दे आणि प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचं स्वप्न पूर्ण होऊ दे! 💯✍️
🇮🇳 आई, आपल्या भारतमातेचं देशविरोधी कारवाया करणाऱ्या देशविरोधी लोकांनापासून सदैव रक्षण कर. देशाच्या एकतेला, अखंडतेला आणि सार्वभौमत्वाला धोका निर्माण करणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई होऊ दे. अशा कृत्यांना पाठिंबा देणाऱ्यांनाही त्यांच्या कृतीची जाणीव होऊ दे. आपल्या देशावर कधीही संकट येऊ देऊ नकोस. भारतमातेचं रक्षण कर! 🚩🙏🏻
💥 ज्यांनी भारतमातेचा गौरवशाली इतिहास पुसून टाकण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या अशा प्रयत्नांना अपयश येऊ दे. इतिहासाशी छेडछाड करू पाहणाऱ्यांना असेच इतिहासात जमा होऊ दे.
💥 देशातील देशद्रोही लोक जे देशविरोधी शक्तींना पाठिंबा त्यांच्या कृतीची त्यांना जाणीव होऊ दे.
🔥आपल्या देशावर कधीही परकीय मातेचे पुत्राचे संकट येऊ देऊ नकोस. भारतमातेचं रक्षण कर! 🚩🙏
💥 आई, जे कधी तुझ्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत होते, त्यांना त्यांच्या कर्माची जाणीव होऊ दे. मागील वर्षी ज्यांनी तुला पोलीस गाडीत बसवून नेलं होतं, त्यांनाही आज वर्षभरानंतर त्याच परिस्थितीला सामोरं जावं लागत असेल, तर काळाने त्यांना काय शिकवलं, याचा विचार करण्याची सद्बुद्धी दे.
कर्माचा हिशेब काळ घेतोच; कोणाचाही अहंकार कायम राहत नाही. शेवटी सत्याचा विजय होऊ दे आणि न्यायाचाच जयजयकार होऊ दे! 🙏🚩
आई, अन्यायाविरुद्…
Читать полностью →