English
Open in Telegram
ममराठी व्याकरण

मराठी व्याकरण

✅ High trust
@marathi · channel · Education · indexed since 2026-08-02
206 189subscribers
7 032average post reach
3.4%ER — reach to subscribers
19posts in 30 days
मराठी व्याकरण
Photo
जिवापाड जपणे👆 मराठी विषयाचा अभ्यास आणखी सोपा करण्यासाठी जॉईन करा : @Marathi
9 · 10.5K ·
म
Photo
जिवाला घोर लागणे👆 मराठी विषयाचा अभ्यास आणखी सोपा करण्यासाठी जॉईन करा : @Marathi
6 · 9.6K ·
मराठी व्याकरण
Photo
नाकाला मिरच्या झोंबणे👆 मराठी विषयाचा अभ्यास आणखी सोपा करण्यासाठी जॉईन करा : @Marathi
7 · 8.5K ·
MPSC चालू घडामोडी ✅ | 01 ऑक्टोबर 2026 ━━━━━━━━━━━━━━━━━━━━ आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६: तिरंदाजी व नेमबाजीत सुवर्ण 🏹🥇🇮🇳 🎯 भारताने कंपाउंड तिरंदाजीतील महिला सांघिक, मिश्र सांघिक आणि पुरुष सांघिक या तिन्ही प्रकारांत सुवर्णपदके जिंकून हॅटट्रिक साधली. 🥇🥇🥇 Women’s Team: 👩‍👩‍👧 ज्योती सुरेखा वेन्नम, चिकिथा तनिपार्थी आणि पृथिका प्रदीप यांनी सुवर्णपदक जिंकले. 🏹✨ Mixed Team: 👫 चिकिथा तनिपार्थी आणि साहिल जाधव यांनी सुवर्णपदक पटकावले. 🥇 Men’s Team: 👨‍👨‍👦 कुशल दलाल, साहिल जाधव आणि गणेश मणी रत्नम थिरुमुरू यांच्या संघाने सुवर्णपदक जिंकले. 💪🏹 Shooting: 🔫 नीरू धांडा आणि कायनान चेनाई यांनी Trap Mixed Team प्रकारात सुवर्णपदक जिंकले. 🎯🥇 ━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ग्रीन एनर्जी कॉरिडॉर टप्पा-३ (PM-DHARA) ⚡🌿 💰 केंद्रीय मंत्रिमंडळाने ₹१,८६,४०५ कोटींच्या 'ग्रीन एनर्जी कॉरिडॉर टप्पा-३' (PM-DHARA) प्रकल्पाला मंजुरी दिली. 🔋 १३५ GW नवीकरणीय ऊर्जेचे वहन आणि ५० GWh क्षमतेची बॅटरी साठवणूक प्रणाली (BESS) उभारण्याचे उद्दिष्ट 🗓️ हा प्रकल्प २०३२-३३ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. 🎯 भारताचे २०३० पर्यंत ५०० GW बिगर-जीवाश्म इंधन क्षमतेचे राष्ट्रीय उद्दिष्ट आहे. ━━━━━━━━━━━━━━━━━━━━ रब्बी पिकांसाठी किमान आधारभूत किंमत (MSP) २०२७-२८ 🌾💰 🏛️ आर्थिक घडामोडींच्या मंत्रिमंडळ समितीने (CCEA) २०२७-२८ रब्बी पणन हंगामासाठी ६ पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ केली. 🌻 करडईच्या (Safflower) हमीभावात सर्वाधिक ₹६७५ ची वाढ (नवीन दर ₹७,२१५/क्विंटल) झाली आहे, तर गव्हाचा हमीभाव ₹२,६१०/क्विंटल करण्यात आला आहे. ━━━━━━━━━━━━━━━━━━━━ नवीन CAFE III निकष (२०२७-३२) 🚗⛽ ⚙️ केंद्रीय विद्युत मंत्रालयाने प्रवासी वाहनांसाठी नवीन CAFE (Corporate Average Fuel Economy) निकष अधिसूचित केल 🗓️ १ एप्रिल २०२७ ते ३१ मार्च २०३२ या कालावधीसाठी लागू. 📈 वाहनांच्या इंधन कार्यक्षमतेत १६.७% सुधारणा करण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य. 📜 हे निकष २००१ च्या ऊर्जा संवर्धन कायद्यांतर्गत केंद्रीय विद्युत मंत्रालयाकडून अधिसूचित केले जातात; BEE त्यांच्या अंमलबजावणीत महत्त्वाची भूमिका बजावते. ━━━━━━━━━━━━━━━━━━━━ बँकर बुक्स एव्हिडन्स कायदा, २०२६ 🏦📚 📅 १ ऑक्टोबर २०२६ पासून देशभरात 'बँकर बुक्स एव्हिडन्स कायदा, २०२६' ची अंमलबजावणी सुरू. 💻 हा नवा क… Read in full →
14 · 10.1K ·
म
Photo
नाकात वेसण घालणे👆 मराठी विषयाचा अभ्यास आणखी सोपा करण्यासाठी जॉईन करा : @Marathi
9 · 9.5K ·
मराठी व्याकरण
Photo
लंकेची पार्वती👆 मराठी विषयाचा अभ्यास आणखी सोपा करण्यासाठी जॉईन करा : @Marathi
10 · 13K ·
म
Photo
जीव कुर्बान करणे👆 मराठी विषयाचा अभ्यास आणखी सोपा करण्यासाठी जॉईन करा : @Marathi
11 · 7.5K ·
म
मराठी व्याकरण
Photo
जीव गहाण ठेवणे👆 मराठी विषयाचा अभ्यास आणखी सोपा करण्यासाठी जॉईन करा: @marathi
8 · 3.5K ·
मराठी व्याकरण
Photo
जीव टांगणीला लागणे👆 मराठी विषयाचा अभ्यास आणखी सोपा करण्यासाठी जॉईन करा: @Marathi #MPSCMarathiPYQ
4 · 6.5K ·
म
Photo
जीव तीळतीळ तुटणे👆 मराठी विषयाचा अभ्यास आणखी सोपा करण्यासाठी जॉईन करा: @Marathi #MPSCMarathiPYQ
4 · 5.6K ·
म
मराठी व्याकरण
Photo
दहीखाऊ महीखाऊ होणे👆 मराठी विषयाचा अभ्यास आणखी सोपा करण्यासाठी जॉईन करा: @Marathi #MPSCMarathiPYQ
6 · 939 ·
म
मराठी व्याकरण
Photo
हबेलहंडी उडणे 👆 मराठी विषयाचा अभ्यास आणखी सोपा करण्यासाठी जॉईन करा: @Marathi #MPSCMarathiPYQ
11 · 8.8K ·
मराठी व्याकरण
मराठी व्याकरण 🔹लिंगविचार 🏀 *आकारान्त पुल्लिंगी* *प्राणिवाचक नामाचे स्त्रीलिंगी रुप* *ईकारान्त* होते व त्याचे नपुसकलिंग रुप एकारांत होते उदा.... मुलगा -- मुलगी - मुलगे पोरगा -- पोरगी - पोरगे 🏀 *काही प्राणिवाचक पुल्लिंगी शब्दास *ईण* प्रत्यय लागून त्यांची स्त्रीलिंगी रुपे होतात. उदा... कुंभार -- कुंभारीण सुतार -- सुतारीण पाटील -- पाटलीण वाघ -- वाघीण माळी -- माळीण 🏀 *काही प्राणिवाचक अकारान्त पुल्लिंगी नामांची स्त्रीलिंगी रुपे ईकारान्त होतात*. उदा... दास - दासी वानर -- वानरी तरुण - तरुणी 🏀 *काही आकारान्त पुल्लिंगी पदार्थ* *वाचक नामांना *ई* प्रत्यय लागून त्यांची लघुत्वदर्शक स्त्रीलिंगी रुपे बनतात.उदा... लोटा - लोटी गाडा - गाडी दांडा -दांडी 🏀 *संस्कृत मधून मराठीत आलेल्या नामांची स्त्रीलिंगी रुपे *ई* प्रत्यय लागून होतात. उदा.... श्रीमान -- श्रीमती युवा - युवती भगवान - भगवती 🏀वरील बाबींचा सराव पाठातील जितके जास्त शब्द घेवून करता येईल तितके करावे. 🏀वर्तमानपत्र , उतारा यांचा वापर करता येईल .
16 · 6K ·
♻संधी व त्याचे प्रकार♻ ✍जोडाक्षरे: ज्या अक्षरात दोन किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येवून शेवटी त्यात एक स्वर मिसळतो यास 'जोडाक्षर' म्हणतात. ❇उदा. 1. विधालय : धा : द + य + आ 2. पश्चिम : श्चि : श + च + इ 3. आम्ही : म्ही : म + ह + ई 4. शत्रू : त्रू : त + र + ऊ 🌀 संधी: ❇स्वरसंधी - जोडशब्द्ध तयार करतांना पहिल्या शब्दातील शेवटचे वर्ण व दुसर्या शब्दातील पहिले वर्ण हे एकमेकांत मिसळतात व त्या दोघांबद्दल एक वर्ण तयार होतो वर्णाच्या अशा एकत्र होण्याच्या प्रकारास 'संधी' असे म्हणतात. ❇उदा. 1. ईश्र्वरेच्छा = ईश्र्वर + इच्छा 2. सूर्यास्त = सूर्य + अस्त 3. सज्जन = सत् + जन 4. चिदानंद = चित् + आनंद 🌀 संधीचे प्रकार: संधीचे मुख्य तीन प्रकार आहेत. ❇स्वर संधी - एकमेकांशेजारी येणारे वर्ण हे जर स्वरांनी जोडले असतील तर त्यांना 'स्वरसंधी' असे म्हणतात किंवा एक पाठोपाठ एक येणारे दोन स्वर एकत्र होण्याच्या क्रियेला स्वरसंधी असे म्हणतात. ♻दिर्घत्व संधी - 1. अ + अ = आ 2. आ + आ = आ 3. आ + अ = आ 4. इ + ई = ई 5. ई + ई = ई 6. इ + इ = ई 7. उ + ऊ = ऊ 8. उ + उ = ऊ ♻नियम - (1) 'अ' किंवा 'आ' यांच्यापुढे इ+ई आल्यास त्या दोघांऐवजी 'ए' येतो आणि 'उ' किंवा 'ऊ' आल्यास 'ओ' येतो व ऋण आल्यास 'र' येतो. ❇उदा. ईश्र्वर+ईच्छा (अ+इ=ए) ईश्र्वर+ए+च्छा=ईश्र्वरेच्छा गण+ईश (अ+इ=ए) गण+ए+श=गणेश उमा+ईश (आ+इ=ए) उम+ए+श=उमेश चंद्र+उदय (अ+उ=ओ) चंद्र+ओ+दय=चंद्रोदय महा+ऋर्षी (आ+ऋ=अर) महा+अर+र्षी=महर्षी देव+ऋर्षी (अ+ऋ=अर) देव+अर+र्षी=देवर्षी (2) अ/आ यांच्यापुढे 'ए/ऐ' हे स्वर आल्यास त्या दोहोंबद्दल 'ऐ' येतो आणि 'अ' किंवा 'अ' किंवा 'आ' या स्वरापुढे 'ओ/औ' स्वर आल्यास त्याबद्दल 'आ' येतो. ❇उदा. एक+एक्य (अ+ए+=ऐ) एक+ऐ+अ= एकैक्य सदा+ऐव (आ+ऐ=ऐ) सदा+ ऐ+व= सदैव मत+एक्य (अ+ऐ=ऐ) मत+ऐ+क्य= मतैक्य प्रजा+ऐक्य (आ+ऐ=ऐ) प्रज+ऐ+क्य= प्रजैक्य जल+औघ (अ+ओ=औ) जल+औ+घ= जलौघ गंगा+औघ (आ+औ=औ) गंगा+औ+घ= गंगौघ (3) इ.उ,ऋ (र्हवस्व/दीर्घ) यांच्यापुढे विजातीय स्वर आल्यास 'इ/ई' बद्दल 'य' हा वर्ण येवून पुढील स्वर त्यात मिसळतो. 'उ/ऊ' बद्दल 'व' हा वर्ण येवून पुढील स्वर त्यात मिसळतो. 'ऋ' बद्दल 'र' हा मिसळून संधी होते. ❇उदा. प्रीती+अर्थ (ई+अ+र्थ) प्रीत्यर्थ इति+आदी (इ+आ+दी) इत्यादी अति+उत्तम (इ+उ+त्तम) अत्युतम प्रति+एक (इ+ए+क) प्रत्ये… Read in full →
35 · 6.7K ·
म
Photo
क्षुधार्त होणे👆 मराठी विषयाचा अभ्यास आणखी सोपा करण्यासाठी जॉईन करा: @Marathi #MPSCMarathiPYQ
6 · 6.1K ·
म
मराठी व्याकरण
Photo
मुखरस पाघळणे 👆 मराठी विषयाचा अभ्यास आणखी सोपा करण्यासाठी जॉईन करा: @Marathi #MPSCMarathiPYQ
6 · 3.4K ·
म
मराठी व्याकरण
Photo
उंटावरचा शहाणा 👆 मराठी विषयाचा अभ्यास आणखी सोपा करण्यासाठी जॉईन करा: @Marathi #MPSCMarathiPYQ
❤34👍8👌1
11 · 10K ·
मराठी व्याकरण
📖केवल प्रयोगी अव्यय📖 आपल्या मनातील दु:ख, आश्चर्य इत्यादी भावना व्यक्त करणार्या शब्दांच्या केवलप्रयोगी अव्यय किंवा उद्गारवाची शब्द असे म्हणतात. 1. हर्षदर्शक : अहाहा, वाहवा, वा, अहा, वा-वा, ओ-हो 📄उदा. अहाहा! किती सुंदर दृश्य आहे. 2. शोकदर्शक : आई ग, अगाई, हाय, हायहाय, ऊं, अं, अरेरे 📄उदा. अरेरे! खूप वाईट झाले. 3. आश्चर्यदर्शक : ऑ, ओहो, अबब, अहाहा, बापरे, ओ, अरेच्या 📄उदा. अबब! केवढा मोठा साप 4. प्रशंसादर्शक : छान, वाहवा, भले, शाब्बास, ठीक, फक्कड खाशी 📄उदा. शाब्बास! तू दिलेले काम पूर्ण केलेस. 5. संमतीदर्शक : ठीक, जीहा, हा, बराय, अच्छा 📄उदा. अछा! जा मग 6. विरोधदर्शक : छेछे, अहं, ऊं, हू, हॅट, छट, छे, च 📄उदा. छे-छे! असे करू नकोस. 7. तिरस्कारदर्शक : शी, शु, शिक्क, इश्श, हुडत, हुड, फुस, हत, छत, छी 📄उदा. छी! ते मला नको 8. संबोधनदर्शक : अग, अरे, अहो, ए, अगा, अगो, बा, रे 📄उदा. अहो! एकलत का ? 9. मौनदर्शक : चुप, चुपचाप, गप, गुपचुप 📄उदा. चुप! जास्त बोलू नको ✳️✏️✳️✏️✳️✏️✳️
❤15👍2
20 · 6.2K ·
*समास* *4) बहुर्वीही समास:* *ज्या सामासिक शब्दाची दोन्ही पदे महत्वाची नसून, त्या दोन पदाशिवाय तिसऱ्याच पदाचा बोध होतो, तसेच हा सामासिक शब्द त्या तिसऱ्याच पदाचे विशेषण असते, त्या सामासिक शब्दास बहुर्वीही समास म्हणतात.* या समासाचे चार प्रकार पडतात: *अ)विभक्ती बहुर्वीही:* विभक्ती बहुर्वीही समासाचे दोन प्रकार पडतात. १} *सामानाधीकरण:* विग्रह करताना यातील दोन्ही पदे एकाच विभक्तीत असतात. 1)लक्ष्मीकांत लक्ष्मी आहे कांता ज्याची विष्णू (प्रथमा) 2)वक्रतुंड वक्र आहे तुंड (तोंड) ज्याचे तो गणपती (प्रथमा) 3)नीलकंठ नील आहे कंठ ज्याचे तो शंकर (प्रथमा) 4)भक्तप्रिया भक्त आहे प्रिय जयला तो देव (प्रथमा) 5)जितेंद्रिय जीत आहेत इंद्रिय ज्याने तो मारुती (प्रथमा) 6)लंबोदर लांब आहे उदार ज्याचे असा तो गणपती (प्रथमा) 7पांडुरंग पांडूर आहे रंग ज्याचे असा तो विठ्ठल (प्रथमा) २ } *व्याधीकरण:* विग्रह करताना दोन्ही पदे भिन्न विभक्तीत असतात. 1)सुधाकर सुधा आहे करत असा तो (चंद्र) (प्रथमा/ सप्तमी) 2)गजानन गजाचे आहे आनन ज्याला तो (गणेश) (षष्ठी/ प्रथमा) 3)भालचंद्र भाळी आहे चंद्र ज्याच्या तो (शंकर) (सप्तमी/ प्रथमा) 4)चक्रपाणी चक्र आहे पानीत असा तो ( विष्णू) (प्रथम/ सप्तमी) *आ) नत्र बहुर्वीही समास:* *ज्या बहुर्वीही समासाचे पहिले पद अ, अन, न, नि, असे नकारदर्शक असेल तर, त्यास नत्र बहुर्वीही समास म्हणतात.* १)अव्यय नाही व्यय ज्याला ते २)अनंत नाही अंत ज्याला ते ३)निर्धन गेले आहे धन ज्याच्या पासून असा तो ४)निरास नाही रस ज्यात ते ५)नाक नाही एक (दु:ख) ज्यात ते ६)अनादी नाही आदी ज्याला तो ७)अखंड नाही खंड ज्याला असे ते ८)अनियमित नियमित नाही असे ते ९)अनाथ जयला नाथ नाही असा तो १०)अस्पृश्य यला स्पर्श करत नाही असे ते ११)निर्बळ निघून गेलेले आहे बळ ज्यापासून तो १२)निर्बुद्ध ज्याला बुद्धी नाही असा तो १३)अकर्मक नाही कर्म जयला असे ते १४)नास्तिक नाही आस्तिक असा तो *इ) सहबहुर्वीही समास:* *जय बहुर्वीही समासाचे पहिले पद 'सह' किंवा 'स' अशी अव्यये असून हा सामासिक शब्द एखाद्या विशेषणाचे कार्य करतो त्यास सहबहुर्वीही समास म्हणतात.* १)सदर आदराने सहित असा तो २)सफल फळाने सहित असे ते ३)सवर्ण वर्णासहित असा तो ४)सहपरिवार परिवारासहित असा तो ५)सबल बलाने सहित असा तो *ई)प्रादि बहुर्वीही समास:* *ज… Read in full →
❤32
25 · 6.9K ·
म
File
गट ब मुख्य 2025 (1).pdf · 11.0 MB · click to show
🔥 संयुक्त गट ब मुख्य 2025 🔥 ━━━━━━━━━━━━━━━━━━━ आयोगाने विचारलेल्या म्हणी व वाक्प्रचार - चित्ररूपात 🎯 📚 अशाच अपडेटसाठी Join करा @Marathi ✅
❤8🔥5
276 · 16.5K ·
मराठी व्याकरण
🔹समास व त्याचे प्रकार ✴✴✴बहुव्रीही समास✴✴✴ ✳ज्या समासातील कोणतेच पद प्रमुख नसून त्या पदाच्या अर्थापेक्षा वेगळ्या अशा वस्तूंचा किंवा व्यक्तींचा त्यामधून बोध होतो त्या समासाला बहुव्रीही समास असे म्हणतात. ✴उदा.     ❇नीलकंठ - ज्याचा कंठ निळा आहे असा (शंकर)   ❇वक्रतुंड - ज्याचे तोंड वक्र आहे असा (गणपती)   ❇दशमुख - ज्याला दहा तोंड आहे असा (रावण) बहुव्रीही समासाचे खालील 4 उपपक्रार पडतात. 🔵i) विभक्ती बहुव्रीही समास - ✳ज्या समासाचा विग्रह करतांना शेवटी एक संबंधी सर्वनाम येते.   ✳अशा सर्वनामाची जी विभक्ती असेल त्या विभक्तीचे नाव समासाला दिले जाते त्याला विभक्ती बहुव्रीही समास असे म्हणतात. ✴उदा.     ❇प्राप्तधन - प्राप्त आहे धन ज्याला तो – व्दितीया विभक्ती   ❇जितेंद्रिय - जित आहे इंद्रिये ज्याची तो – षष्ठी विभक्ती   ❇जितशत्रू - जित आहे शत्रू ज्याने तो – तृतीया विभक्ती   ❇गतप्राण - गत आहे प्राण ज्यापासून तो – पंचमी विभक्ती 🔵ii) नत्र बहुव्रीही समास - ✳ज्या समासाचे पहिले पद नकारदर्शक असते त्याला नत्र बहुव्रीही समास असे म्हणतात.  या समासातील पहिल्या पदात अ, न, अन, नि अशा नकारदर्शक शब्दांचा वापर केला जातो. ✴उदा.     ❇अनंत - नाही अंत ज्याला तो   ❇निर्धन - नाही धन ज्याकडे तो   ❇नीरस - नाही रस ज्यात तो 🔵iii) सहबहुव्रीही समास - ✳ज्या बहुव्रीही समासाचे पहिले पद सह किंवा स अशी अव्यये असून हा सामासिक शब्द एखाधा विशेषणाचे कार्य करतो त्यास सहबहुव्रीही समास म्हणतात. ✴उदा.     ❇सहपरिवार - परिवारासहित असा जो   ❇सबल - बलासहित आहे असा जो   ❇सवर्ण - वर्णासहित असा तो 🔵iv) प्रादिबहुव्रीही समास - ✳ज्या बहुव्रीही समासाचे पहिले पद प्र, परा, अप, दूर, सु, वि अशा उपसर्गानी युक्त असेल तर त्याला प्रादिबहुव्रीही समास असे म्हणतात. ✴उदा.     ❇सुमंगल - पवित्र आहे असे ते   ❇सुनयना - सु-नयन असलेली स्त्री   ❇दुर्गुण - वाईट गुण असलेली व्यक्ती
❤1
561 ·
समानार्थी शब्द ➖➖➖➖➖ कुतूहल = उत्सुकता कुटुंब = परिवार कुशल = हुशार, तरबेज कुत्रा = श्वान कुटी = झोपडी कुचंबणा = घुसमट कृपण = कंजूष कृश = हडकुळा कोवळीक = कोमलता कोठार = भांडार कोळिष्टक = जळमट खण = कप्पा खडक = मोठा दगड, पाषाण खटाटोप = प्रयत्न खग = पक्षी खड्ग = तलवार खरेपणा = न्यायनीती ख्याती = कीर्ती, प्रसिद्धी, लौकिक खात्री = विश्वास खाली जाणे = अधोगती खिडकी = गवाक्ष खेडे = गाव, ग्राम खोड्या = चेष्टा, मस्करी गरज = आवश्यकता गवत = तृण गर्व = अहंकार गाय = धेनू, गोमाता गाणे = गीत, गान गंमत = मौज, मजा गंध = वास, दरवळ ग्रंथ = पुस्तक गाव = ग्राम, खेडे गुन्हा = अपराध गुलामी = दास्य गोड = मधुर गोणी = पोते गोष्ट = कहाणी, कथा गौरव = सन्मान ग्राहक = गिऱ्हाईक घर = सदन, गृह, निकेतन, आलय घरटे = खोपा घागर = घडा, मडके घोडा = अश्व, हय, वारू चव = रुची, गोडी चरण = पाय, पाऊल चरितार्थ = उदरनिर्वाह चक्र = चाक चऱ्हाट = दोरखंड चाक = चक्र चंद्र = शशी, रजनीनाथ, इंदू चिंता = काळजी चिडीचूप = शांत चिमुरडी = लहान चूक = दोष चेहरा = मुख चौकशी = विचारपूस छंद = नाद, आवड छान = सुरेख, सुंदर छिद्र = भोक जग = दुनिया, विश्व जत्रा = मेळा जन = लोक, जनता जमीन = भूमी, धरती, भुई जंगल = रान जीव = प्राण जीवन = आयुष्य, हयात जुलूम = अत्याचार, छळ, बळजोरी, अन्याय झाड = वृक्ष, तरू झोपडी = कुटीर, खोप झोप = निद्रा झोका = झुला झेंडा = ध्वज, निशाण ठग = चोर ठिकाण = स्थान डोके = मस्तक, शीर्ष, शीर डोळा = नेत्र, नयन, लोचन डोंगर = पर्वत, गिरी ढग = मेघ, जलद, पयोधर, अभ्र ॠण = कर्ज तक्रार = गाऱ्हाणे तळे = तलाव, सरोवर, तडाग त्वचा = कातडी तारण = रक्षण ताल = ठेका तुरंग = कैदखाना, बंदिवास तुलना = साम्य थट्टा = मस्करी, चेष्टा थवा = समूह थोबाड = गालपट दगड = पाषाण, खडक दरवाजा = दार, कवाड दाम = पैसा दृश्य = देखावा दृढता = मजबुती दिवस = दिन, वार, वासर दिवा = दीप, दीपक दूध = दुग्ध, पय द्वेष = मत्सर, हेवा देव = ईश्वर, विधाता देश = राष्ट्र दार = दरवाजा दारिद्र्य = गरिबी दौलत = संपत्ती, धन धरती = भूमी, धरणी ध्वनी = आवाज, रव नदी = सरिता नजर = दृष्टी नक्कल = प्रतिकृती नमस्कार = वंदन, नमन नातेवाईक = नातलग नाच = नृत्य निश्चय = निर्धार निर्धार = निश्चय निर्… Read in full →
5 · 438 ·
ल, मारुत, समीर, वायू वाट = मार्ग, रस्ता वाद्य = वाजप वातावरण = रागरंग वेग = गती वेळ = समय, प्रहर वेळू = बांबू वेश = सोशाख वेदना = यातना विश्रांती = विसावा, आराम वितरण = वाटप, वाटणी विद्या = ज्ञान विनंती = विनवणी विरोध = प्रतिकार, विसंगती विसावा = विश्रांती, आराम विश्व = जग, दुनिया वीज = विद्युर, सौदामिनी वृत्ती = स्वभाव वृद्ध = म्हातारा वैराण = ओसाड, भकास, उजाड वैरी = शत्रू, दुष्मन वैषम्य = विषाद व्यवसाय = धंदा व्याख्यान = भाषण शरीर = देह, तनू, काया, कुडी, अंग शक्ती = सामर्थ्य, जोर, बळ शर्यत = स्पर्धा, होड, चुरस शहर = नगर शंकर = चंद्रचूड श्वापद = जनावर शास्त्रज्ञ = वैज्ञानिक शाळा = विद्यालय शाळुंका = शिविलिंग शेत = शिवार, वावर, क्षेत्र शीण = थकवा शील = चारित्र्य शीतल = थंड, गार शिक्षा = दंड, शासन श्रम = कष्ट, मेहनत सकाळ = प्रभात, उष:काल सचोटी = खरेपणा सफाई = स्वच्छता सवलत = सूट सजा = शिक्षा सन्मान = आदर संकट = आपत्ती संधी = मोका संत = सज्जन, साधू संपत्ती = धन, दौलत, संपदा सायंकाळ = संध्याकाळ सावली = छाया साथी = सोबती, मित्र, दोस्त, सखा स्तुती = प्रशंसा स्पर्धा = चुरस, शर्यत, होड, पैज स्थान = ठिकाण, वास, ठाव स्त्री = बाई, महिला, ललना संध्याकाळ = सायंकाळ, सांज स्फूर्ती = प्रेरणा स्वच्छता = झाडलोट सुवास = सुगंध, परिमल, दरवळ सुंदर = सुरेख, रमणीय, मनोहर, छान सागर = समुद्र, सिंधू, रत्नाकर, जलधी सावली = छाया सामर्थ्य = शक्ती, बळ साहित्य = लिखाण सेवा = शुश्रूषा सिनेमा = चित्रपट, बोलपट सिंह = केसरी, मृगराज, वनराज सुविधा = सोय सुगंध = सुवास, परिमळ, दरवळ सूत = धागा, दोरा सूर = स्वर सूर्य = रवी, भास्कर, दिनकर, सविता सोने = सुवर्ण, कांचन, हेम सोहळा = समारंभ हद्द = सीमा, शीव हल्ला = चढाई हळू चालणे = मंदगती हकिकत = गोष्ट, कहाणी, कथा हात = हस्त, कर, बाहू हाक = साद हित = कल्याण हिंमत = धैर्य हुकूमत = अधिकार हुरूप = उत्साह हुबेहूब = तंतोतंत हेका = हट्ट, आग्रह क्षमा = माफी
4 · 464 ·
म
💢 शब्दसिद्धी व त्याचे प्रकार💢 शब्द कसा तयार झाला आहे, म्हणजे सिद्ध कसा झाला आहे यालाच 'शब्दसिद्धी' असे म्हणतात. ⭕शब्दांचे खालील प्रकार पडतात. 🌀 तत्सम शब्द जे संस्कृत शब्द मराठी भाषेत जसेच्या तसे काहीही बादल न होता आले आहेत त्यांना 'तत्सम शब्द ' असे म्हणतात. 💠उदा. राजा, भूगोल, चंचू, पुष्प, परंतु, भगवान, कर, पशु, अंध, जल, दीप, पृथ्वी, तथापि, कवि, वायु, भीती, पुत्र, अधापि, मति, पुरुष, शिशु, गुरु, मधु, गंध, पिता, कन्या, वृक्ष, धर्म, सत्कार, समर्थन, उत्सव, विद्वान, संत, निस्तेज, कर, जगन्नाथ, दर्शन, उमेश, स्वामि, मंदिर, तिथी, सूर्य, स्वल्प, घृणा, पिंड, कलश, प्रात:क, दंड, पत्र, ग्रंथ, उत्तम, आकाश पाप, मंत्र, शिखर, सूत्र, कार्य, होम, गणेश, सभ्य, कन्या, देवर्षि, वृद्ध, संसार, प्रीत्यर्थ, कविता, उपकार, परंतु, गायन, अश्रू, प्रसाद, अब्ज, राजा, संमती, घंटा, पुण्य, बुद्धी, अभिषेक, संगती, श्रद्धा, प्रकाश, सत्कार, देवालय, तारा, समर्थन, नयन, उत्सव, दुष्परिणाम, नैवेध. 🌀 तदभव शब्द जे शब्द संस्कृत मधून मराठीमध्ये येतांना त्यांच्या मूळ रूपात काही बदल होतो त्या शब्दांना 'तदभव शब्द' असे म्हणतात. 💠उदा. घर, पाय, भाऊ, सासू, सासरा, गाव, दूध, घास, कोवळा, ओळ, काम, घाम, घडा, फुल, आसू, धुर, जुना, चाक, आग, धूळ, दिवा, पान, वीज, चामडे, तहान, अंजली, चोच, तण, माकड, अडाणी, उधोग, शेत, पाणी, पेटी, विनंती, ओंजळ, आंधळा, काय, धुर, पंख, ताक, कान, गाय. 🌀देशी/देशीज शब्द महाराष्ट्रातील मूळ रहिवाशांच्या बोलीभाषेमधील वापरल्या जाणार्या शब्दांना 'देशी शब्द' असे म्हणतात. 💠उदा. झाड, दगड, धोंडा, घोडा, डोळा, डोके, हाड, पोट, गुडघा, बोका, रेडा, बाजारी, वांगे, लुगडे, झोप, खुळा, चिमणी, ढेकूण, कंबर, पीठ, डोळा, मुलगा, लाजरा, वेढा, गार, लाकूड, ओटी, वेडा, अबोला, लूट, अंघोळ, उडी, शेतकरी, आजार, रोग, ओढा, चोर, वारकरी, मळकट, धड, ओटा, डोंगर. 🌀 परभाषीय शब्द : संस्कृत व्यतिरिक्त इतर भाषांमधून मराठीत आलेल्या शब्दांना ' परभाषीय शब्द' असे म्हणतात. 🌀1) तुर्की शब्द 💠कालगी, बंदूक, कजाग 🌀2) इंग्रजी शब्द 💠टी.व्ही., डॉक्टर, कोर्ट, पेन, पार्सल, सायकल, स्टेशन, हॉस्पिटल, बस, फाईल, रेल्वे, पास, ब्रेक, कप, मास्तर, फी, बॉल, स्टॉप, ऑफिस, एजंट, टेलिफोन, सिनेमा, सर्कस, पॅंट, बॅट, पोस्ट, तिकीट, ड्रायव्हर, मोटर, कंडक्टर, नंबर, टीचर, सर,… Read in full →
7 · 689 ·
म
मराठी व्याकरण
आपणांस व आपल्या परिवारास विजयादशमी व दसरा सणाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा...!! - empsckatta परिवार 🍀💐🍀
1.4K ·

An open public feed from the search index ChatCrawler — “Google for public Telegram”; refreshed as the venue is crawled. Times are UTC.

Public content only, official Telegram API. About · FAQ · Index limits · Remove a page · Catalog · Search · How we count