ChatCrawlersearch across public Telegram Open the app
T

Town Planning Group by ATP Warriors

1 010 members
4 August 2026
I
Фотография
click to show
ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, विचारवंत आणि बिहार, त्रिपुरा व पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील (दादा) यांचे आज, ४ ऑगस्ट २०२६ रोजी कोल्हापूर येथील निवासस्थानी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. वयाच्या ९० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने शिक्षण, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील एक महान मार्गदर्शक हरपला आहे.त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन आणि भावपूर्ण श्रद्धांजली! त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो, हीच प्रार्थना.
2.1K ·
5 August 2026
आयोगाने महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2025 अंतिम उत्तरतालिकेत पेपर १ मध्ये २ प्रश्न रद्द आणि ४ प्रश्नांत बदल केला आहे. पेपर २ मध्ये ३ प्रश्न रद्द आणि ३ प्रश्नांत बदल केला आहे. ATP मध्ये सुद्धा आयोगाने अश्याच प्रकारे ३ प्रश्न रद्द केले होते.आयोगाची ही परंपरा पाहता आयोगाने अस करण्यापेक्षा इथून पुढे लॉट पद्धतीने निकाल लावला तर बरे होईल ज्यांच नशीब चांगल त्यांना फायदा...!
2K ·
I
⚠️ गट क संयुक्त पूर्व परीक्षा अर्ज भरण्याची आज शेवटची तारीख आहे. अजूनही विविध संवर्गांचा समावेश करण्यासाठी आयोगाकडे मागणीपत्रे प्राप्त होत आहेत.भविष्यात एखादा संवर्ग समाविष्ट झाला आणि अर्ज भरला नाही ही खंत मनात राहू नये. मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 10 लाखांहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. सर्व संवर्गांसाठी एकच संयुक्त पूर्व परीक्षा असल्याने पूर्व परीक्षेचा कटऑफ कमी राहण्याची जास्त शक्यता आहे. त्यामुळे सध्या कोणतीही इतर स्पर्धा परीक्षा देत नसाल तर काहीही न करण्यापेक्षा हा अर्ज नक्की भरा. एक संधी कधी आयुष्य बदलून टाकेल, हे सांगता येत नाही. 🔰नोट - हे फक्त एक वैयक्तिक मत आहे प्रत्येकाने आपापल्या सदसद्विवेकबुद्धीनुसार योग्य तो निर्णय घ्यावा.
2.1K ·
14 August 2026
Файл
OVERRIDE RR ENGINEERING.pdf · 2.6 MB · click to show
🛡️Civil Engineering candidates साठी महत्वाचे...! ✅ महाराष्ट्र शासनाने Maharashtra Engineering Services मधील काही Group-A आणि Group-B (Gazetted) पदांसाठी शैक्षणिक पात्रता नव्याने स्पष्ट केली आहे. ✅ B.E./B.Tech Civil Engineering असणाऱ्यांना विशेषतः खालील ३ पदांसाठी पात्र समजण्यात येईल. ① Deputy Forest Engineer ② Assistant Engineer (Forest Establishment) ③ Deputy Superintendent (Land Records) ✅ अधिसूचनेनुसार जुन्या सेवाप्रवेश नियमांमधील इतर तरतुदी लागू राहणार आहेत याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
1.5K ·
🎯 जाहिरात क्र. ५१/२०२४ कागदपत्र पडताळणी प्रक्रियेला गती देण्यासाठी संबंधित उमेदवारांनी स्वतः पाठपुरावा करणेबाबत...! सद्यस्थितीत जाहिरात क्रमांक ५१/२०२४ अंतर्गत पात्र ठरलेल्या उमेदवारांपैकी केवळ २० ते २५% उमेदवारांनाच Document Verification संदर्भातील letters प्राप्त झाली आहेत. सदर प्रक्रिया संथ गतीने सुरू असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे उर्वरित सर्व पात्र उमेदवारांनी आपल्या Document Verification च्या प्रक्रियेबाबत संबंधित कार्यालयाकडे नियमितपणे पाठपुरावा करणे अत्यंत आवश्यक आहे अन्यथा पुढील प्रक्रिया, शिफारस तसेच Joining ला अनावश्यक विलंब होण्याची शक्यता आहे. सदर विषयासंदर्भातील मेसेज ATP Officers (२०२४ - २५) या ग्रुपवर यापूर्वीच पोस्ट करण्यात आलेला आहे. मात्र, ATP WARRIORS च्या मुख्य चॅनेलवरील कोणाच्या वैयक्तिकओळखीत जाहिरात क्रमांक ५१/२०२४ मधील पात्र उमेदवार असतील ज्यांचे verification अजून पूर्ण झाले नाही किंवा संबंधित विभागातील कोणाचे References असतील तर त्यांचा योग्य पद्धतीने पाठपुरावा करून संबंधित उमेदवारांच्या Verification प्रक्रियेला गती देण्यासाठी विनंती करावी. - Request from some ATP Officers & ATP WARRIORS.
1.6K ·
I
Видео
3.0 MB · click to show
गुलामगिरीची सवय लागलेल्या गुलामांना स्वराज्याची स्वप्नं कधीच पडत नसतात. आपल्या राजांनी स्वराज्याचे स्वप्न पाहण्याचे धाडस केले, म्हणून पुढच्या पिढ्यांना स्वातंत्र्याचे स्वप्न पाहता आले त्यामुळे आजचे स्वातंत्र्य हे आपल्याला मिळालेली खैरात नसून ३५० वर्षांपूर्वीचा मराठी मुलखात उदयास आलेला धगधगता विचार आहे आणि तो त्याच पद्धतीने येणाऱ्या पिढ्यांमध्ये आजन्म रुजला पाहिजे कारण हे राष्ट्र व्हावे ही तो श्रींची इच्छा..! 🇮🇳 आपणा सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳 जय हिंद! जय महाराष्ट्र! 🚩
1.9K ·
17 August 2026
I
सध्या लाइव्ह यायची काहीएक गरज नव्हती पण खूप जणांचे द्विधा मनस्थितीतून सहायक नगर रचनाकार पदासंदर्भात नवीन जाहिरातीबाबतीत मेसेजेस येत आहेत यासाठी तुमच्या माहितीस्तव आपण ह्या आठवड्यात एक लाइव्ह सेशन अरेंज करू तूर्तास तुमचे काही प्रश्न असतील तर 👉🏻 @ATPHelpdesk2022_bot वरती पाठवून ठेवा.
1.8K ·
18 August 2026
I
Видео
scene_gathhali_aanae_anashacatata_im0aHOql_online_video_cutt · 7.5 MB · click to show
हेल्पडेस्क वरचे तुमचे खूप सारे प्रश्न आणि त्यासंदर्भात चर्चेसाठी भेटुयात येत्या रविवारी संध्याकाळी ठीक ७ वाजता...! 📱 Telegram - ATP WARRIORS
1.9K ·
19 August 2026
20 August 2026
Фотография
click to show
ई-प्रमाण नोंदणीकृत दस्ताची डिजिटल प्रमाणित प्रत राज्य शासनाच्या सेवा पंधरवडा या उपक्रमाअंतर्गत विभागामार्फत नागरिकांना घरबसल्या आपल्या नोंदणीकृत दस्ताची डिजिटल प्रत मिळणार आहे. दि. 13 ऑगस्ट 2026 पासून ही सुविधा संपूर्ण महाराष्ट्र राज्यात सुरू करण्यात आली आहे.
1.7K ·
22 August 2026
Ссылка
click to show
🎯Attention Warriors, PPT असल्या कारणाने उद्याचे सहायक नगर रचनाकार भरती : खरी परिस्थिती काय? सर्व शंका आणि वस्तुस्थिती (Live Guidance & Discussion) by ATP WARRIORS हे सेशन ऍप्लिकेशन वरती लाइव्ह होईल याची सर्वांनी नोंद घ्यावी. काही महत्त्वाच्या माहितीमुळे रेकॉर्डिंग उपलब्ध असणार नाही त्यामुळे सर्वांनी लाइव्ह जॉइन करणे अनिवार्य आहे. 👉🏻iPhone वापरकर्त्यांनी App Store वरून Classplus ऍप्लिकेशन डाऊनलोड करून 'njfczl' हा ऑर्गनायझेशन कोड वापरावा. https://njfczl.on-app.in/app/oc/810894/njfczl?utm_source%3Dtelegram%26utm_medium%3Dtutor-course-referral-tg%26utm_campaign%3Dcourse-overview-app
1.3K ·
I
कोणाला लॉगिन करताना अथवा इतर कोणत्या बाबतीत अडचण येत असेल तर त्यांनी @ATPHelpdesk2022_bot येथे संपर्क साधावा निरसन केले जाईल.
1.2K ·
23 August 2026
Ссылка
click to show
आम्ही आशा व्यक्त करतो की आजच्या सेशनद्वारे तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळाली असतील. इथून पुढेही ATP WARRIORS कडून प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला योग्य मार्गदर्शन आणि शेवटपर्यंत साथच मिळेल ह्याची आम्ही आज पुन्हा एकदा ग्वाही देतो. येणाऱ्या काळात उपलब्ध होणारी माहिती आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहचवू तोपर्यंत तुम्ही तुमच्या आयुष्यातील अमूल्य वेळेला योग्य न्याय द्याल अशी आशा आम्ही व्यक्त करतो. सेशनमध्ये सांगितल्याप्रमाणे जाहिरात क्रमांक ५१/२०२४ बाबत त्यावेळी (बरोबर २ वर्षापूर्वी ह्याच तारखेला) असणाऱ्या परिस्थितीबाबत लिंक खाली शेअर करत आहोत (यावेळीही तसंच होईल असं नाही परंतू सर्वसामान्य रूपरेषा कळावी हा ह्यामागील उद्देश आहे) https://t.me/AsstTownPlannerMPSC/2263
1.2K ·
24 August 2026
Фотография
click to show
🎯 कालचे सेशन का घेतले? जाहिरात कधी येणार? किती जागा येणार? परीक्षा पद्धत बदलेल का? Recruitment Rules मध्ये बदल होणार का? वगैरे वगैरे.. यासारख्या तुमच्या अनेक प्रश्नांची फक्त उत्तरं देणं हा उद्देश नव्हता. कालच्या सेशनचा उद्देश माहितीच्या पलीकडे जाऊन तिच्यामागची प्रक्रिया समजून घेणे हा होता. आकृतीबंध काय सांगतो? Roster कसे अपडेट होते? रिक्त पदे कशी निश्चित होतात? मागणीपत्र कसं तयार होतं? शासनाची मंजुरी कधी मिळते? MPSC पर्यंत मागणीपत्र कसं पोहोचतं? आणि त्यानंतर जाहिरात कशी येते? ही प्रक्रिया समजली की एखादी माहिती ऐकून तुम्ही स्वतः विचार करू शकता की नेमका याचा खरा अर्थ काय? काल आम्ही तुम्हाला फक्त उत्तरं देण्याचा प्रयत्न केला नाही. तुम्हाला प्रश्न विचारण्याची आणि उत्तरामागचं कारण समजून घेण्याची दृष्टी देण्याचा प्रयत्न केला जेणेकरून तुम्ही योग्य तो निर्णय घ्याल. 📱ATP WARRIORS Rise with Knowledge and Humanity.
1.1K ·
I
Фотография
click to show
भूमी अभिलेख विभागाने विकसित केलेल्या नव्या संगणक प्रणालीद्वारे आता जमीन व मालमत्तेशी मोबाईल क्रमांक 'लिंक' करता येणार आहे. यासाठी केवळ ५० रुपये वार्षिक शुल्क असणार आहे. या सुविधेमुळे जमिनीचे सर्व व्यवहार, फेरफार आणि सरकारी जमिनींच्या अनधिकृत हस्तांतरणाची माहिती तत्काळ अलर्टद्वारे मोबाईलवर मिळेल. यामुळे बनावट कागदपत्रे आणि जमिनींच्या व्यवहारांमधील फसवणुकीला आळा बसण्यास मोठी मदत होणार आहे.
1.3K ·
25 August 2026
26 August 2026
28 August 2026
I
Фотография
click to show
ह्या सर्व गोंधळात विचार करण्यासारखी अजून एक बाब म्हणजे जे काही तज्ञ व्यक्ती प्रश्न तयार करत असतात त्यांच्यावर कोणत्या प्रकारचे नियंत्रण आहे हे स्पष्ट झाले पाहिजे कारण NEET मध्ये सुद्धा आणि औषध निरीक्षकमध्येसुद्धा एक गोष्ट समाईक आहे ते म्हणजे बाह्य व्यक्तींचा सहभाग बाहेर ह्या गोष्टी पोहचतातच कश्या? संदर्भातून प्रश्न आले समजून घेता येईल पण जसेच्या तसे आले असतील ते पण MPSC सारख्या परीक्षांमध्ये तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे.
952 ·
30 August 2026
Фотография
click to show
ही केवळ आजच्या परीक्षेपुरती बाब नाही. उद्याच्या परीक्षा कशा असतील, त्यातील पारदर्शकता, सुरक्षितता आणि उमेदवारांच्या हिताचे संरक्षण कसे होईल यावर अशा सूचनांचा परिणाम होऊ शकतो म्हणून आपल्यामुळे काय फरक पडणार? असा विचार न करता आपली सूचना/मत नक्की नोंदवा.
785 ·
I
Фотография
click to show
नगर रचनाकार पदाच्या परीक्षा साठी ३ वर्ष अनुभवाची अट असताना २०२३ मध्ये ३ वर्षे कमी अनुभव असतान सुद्धा मुलाखतीला पात्र केल्याचे या वरून दिसून येत आहे. सदर बाब आपल्या चॅनेल चे सदस्य यांनी आम्हाला लक्षात आणून दिली. २०२६ ची सदर परीक्षा देणाऱ्या उमेदवार यांनी या कडे लक्ष असू द्या.
6.5K ·
31 August 2026
I
🎯 Power of the People is greater than People in power...! एक गोष्ट इथे स्पष्टपणे सांगावीशी वाटते सध्या परिस्थिती संवेदनशील आहे ठोस पुरावे उपलब्ध नसताना काही परीक्षांच्या बाबतीत कोणत्याही निष्कर्षावर पोहोचणे किंवा कोणावरही शंका उपस्थित करणे आम्हाला तर्कसंगत वाटत नाही. सध्याच्या परिस्थितीमुळे मनात संभ्रम निर्माण होणे साहजिक आहे पण निर्माण झालेल्या अस्वस्थतेतून केवळ अंदाज किंवा चर्चेच्या आधारावर कोणावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करणे योग्य नाही. तुमच्या म्हणण्यानुसार काही चुकीची गोष्ट असेल तर त्यासंदर्भात ठोस माहिती, तथ्य किंवा पुरावा असेल, तर तो आमच्यापर्यंत पोहोचवा आम्ही आमच्या पातळीवर तुम्हाला सर्वतोपरी मदत करू मग समोर कोणीही असो योग्य ती भूमिका घेतली जाईल कारण मुद्दा प्रक्रियेची पारदर्शकता आणि योग्यतेचा आहे.
373 ·
Архив по месяцам
Open in Telegram Каталог площадок Искать в ChatCrawler

A snapshot of an open public feed from the search index ChatCrawler — “Google for public Telegram”; refreshed as the venue is crawled. Times are UTC.

Public content only, official Telegram API. About · FAQ · What we do not do · Remove a page · Catalog